Monday, January 18, 2016

पत्ता कोबी पराठा - Patta Kobi Pratha

पत्ता कोबी पराठा - Patta Kobi Pratha

साहित्य :
  • पत्ता कोबी - ५०० ग्राम (किसून बारीक केलेली )
  • गव्हाचे पीठ - १०० ग्राम 
  • ओवा - १/२ छोटा चमचा 
  • जीर - १/२ छोटा चमचा 
  • हळद - १/२ छोटा चमचा 
  • हिरवी मिरची - १ ( चिरून तुकडे केलेली)
  • लाल तिखट - १ छोटा चमचा (किंवा आव्श्क्तेनुसार )
  • तेल - १ मोठा चमचा 
  • मीठ - आव्श्क्तेनुसार 
कृती :
  • एका भांड्यात गव्हाचे पीठ , किसलेला कोबी , हळद , लाल तिखट , हिरवी मिरची, जीर, ओवा आणि आव्श्क्तेनुसार मीठ टाका व सर्व मिश्रण चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्या . 
  • एका भांड्यात थोड तेल गरम करायला ठेवा . तेल गरम झाले कि ते त्या मिश्रणात टाका , व थोडे थोडे पाणी टाकीत मिश्रणाला मिक्स करीत एक गोळा तयार करा . तयार गोळ्याला चांगले गुळगुळीत होईपर्यंत मळा . व जवळ जवळ आर्ध्या तासाकरिता बाजूला ठेवा . 
  • आता तयार मिश्रणाचा थोडासा भाग घेऊन पोळी लाटायला घ्या . 
  • दरम्यान तवा गरम करायला ठेवा . तवा गरम झाला कि त्यावर थोडे तेल टाका व चमच्याने गोल पसरून घ्या . आता त्यावर पोळी टाका व थोडी भाजू द्या . आता पोळी पलटवा व दुसरी बाजू तव्यावर टाका . सभोवताली थोडे चमच्याने तेल सोडा . 
  • पोळी चांगली भाजली कि ती एका प्लेटमध्ये जमा करा , व गरमा गरम सर्व करा . 

Saturday, January 16, 2016

सोल कढी - Sol Kadhi

सोल कढी - Sol Kadhi

साहित्य :
  • कोकम - ४ ते ५
  • हिंग - १/४ छोटा चमचा 
  • नारळाचे दुध - १ कप 
  • हिरवी मिरची - आव्श्क्तेनुसार 
  • कोथिंबीर - थोडासा ( बारीक चिरलेला )
  • मीठ - आव्श्क्तेनुसार 
कृती :
  • सर्वप्रथम जवळ जवळ एक कप पाणी गरम करायला ठेवा , पाणी गरम झाले कि त्यात कोकम टाकून १ तासाकरिता बाजूला ठेवा . नंतर कोकम चांगले निथळून बाहेर काढा. व तयार मिश्रणात थोडा हिंग व बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून चांगले ढवळा. 
  • आता त्यात नारळाचे दुध आणि आव्श्क्तेनुसार मीठ टाका व थोडी कोथिम्बिर टाकून सजवा . 
  • तुमची सोल कढि तयार आहे . 

Saturday, January 9, 2016

टॉमेटो सूप - Tomato Soup

टॉमेटो सूप - Tomato Soup

साहित्य :
  • टॉमेटो - १/२ किलो (धून काप केलेले )
  • आले - एक तुकडा ( चीललेका )
  • वाटाणा - अर्धा कप 
  • गाजर - अर्धा कप ( बारीक कीस केलेला )
  • मिरे- १/२ टीस्पून 
  • तूप - १ टेबल चमचा 
  • मक्याचे पीठ - १ टेबल चमचा 
  • मीठ - स्वादानुसार 
कृती :
  • टॉमेटो आणि आल्याला मिक्सी मध्ये चांगले बारीक करून घ्या . व एका भांड्यात टाकून १० मिनिटे उकळायला ठेवा . नंतर चाळनीच्या मदतीने मिश्रणाला चाळून घ्या . 
  • .थोड्याश्या पाण्यामध्ये मक्याचे पीठ घोळून गाठी काढून घ्या .
  • एका काढईत तूप गरम करायला ठेवा , तूप  गरम झाले कि त्यात गाजर व वाटाणा चांगला परतून घ्या . नंतर त्यात मक्याच्या पीठाचे पाणी , टॉमेटो , मिरे आणि आव्श्क्तेनुसार मीठ टाका . व आव्श्क्तेनुसार पाणी घालून उकळी येईपर्यंत शिजवा . 
  • तुमचे टॉमेटो सूप तयार आहे . टॉमेटो सूप वर थोडी क्रीम टाकून सर्व केलास तर टॉमेटो सूप आणखी टेस्टी लागतो .