Sunday, December 27, 2015

रसगुल्ला रेसिपी - Rasgulla


साहित्य – 1 लिटर दुध ( मलाई न काढता )
300 ग्राम साखर
2 लिंबाचा रस

कृती –

  • एक  स्वच्छ भांडे घेऊन त्यात दूध उकळून घ्यावे. जेवढा लिंबूचा रस आहे तेवढेच त्यात पाणी घाला  व लिंबाचा रस हळूहळू उकळत्या दुधात , दुध फाटे पर्यन्त टाका  आणि दुध हलवत रहा  जेव्हा दुध चांगल्या प्रकारे फाटेल  तेव्हा लिंबाचा रस टाकणे बंद करा  ,  ह्या  फाटलेले दुध एका सूती कपड्यात ओतून गाळून घ्या व ( तयार झालेल्या पनीरला ) कपड्यातच थंड पाण्याने धुवून घ्या जेणेकरून त्यातील आंबटपणा निघून जाईल.नंतर कपडा चारही बाजूंनी एकत्र गुंडाळून हाताने दाबून पाणी पूर्णपणे निथळून घ्या
  • तयार झालेला गोळा एका ताटात काढा आणि हाताने  एकजीव  होईपर्यंत मळून घ्या व त्याचे लाडूसारखे छोटे छोटे गोळे तयार करून घ्या.
  • नंतर  एका पातेल्यात साखर व  4 कप पाणी टाका आणि उकळून घ्या, उकळी आल्यानंतर त्यात तयार केलेले गोळे एक एक करून सोडा.व पातेले झाकून ठेवा , 10 -15 मिनिट रसगुल्ले शिजवून घ्या
  • तयार झालेले रसगुल्ले पाकासहित   एका भांड्यात काढून घ्या व थंड होऊ द्या, 5- 7 तासानंतर हे रसगुल्ले तुम्ही सर्व्ह करू शकता.

ढोकला रेसिपी - Dhokla

साहित्य -  Ingredients
1 कप बेसन पीठ / 1 cup Gram flour
1/2 कप  दही / 1/2 cup Curd (yogurt)
2 चमचे रवा / 2 tablespoon Semolina
1 चमचा साखर / 1 tablespoon Sugar
1 छोटा चमचा हळद /1 teaspoon Turmeric powder
१/२ चमचा आले पेस्ट / 1 teaspoon crushed Ginger paste
१/२ चमचा हिरवि मिरची पेस्ट/ 1 teaspoon crushed Green Chilli paste
१ चमचा तेल / 1 teaspoon Oil
चवीनुसार मीठ / Salt Add to taste(1 tsp)
इनो / 1 tsp Eno salt

फोडणी साठीचे साहित्य / For Tempering:
2 चमचा तेल / 2 tablespoons Oil
1 लहान चमच मोहरी/ 1 teaspoon Mustard Seeds
१/२ लहान चमचा हिंग / 1 pinch Asafoetida
2 हिरव्या मिरच्या ( उभ्या चिरलेल्या )/2 Green Chillies, slit lengthwise and cut into halves
कोथिंबीर/Coriander Leaves

कृती -
1) एका भांड्यात  १ कप बेसन पिठ घ्या  त्यात २ चमचे रवा ,1/2 कप दही 1/4 कप पाणी टाका   चांगले मिसळून घ्या व हे मिश्रण चार तास बाजूला ठेवा.
2) चार तासानंतर वरील मिश्रणामध्ये  1 चमचा साखर, १/२ चमचा मिरची पेस्ट, १/२ चमचा आले पेस्ट, १ लहान चमचा हळद, , १ चमचा तेल, चवीपुरते मिठ हे सर्व साहित्य एकत्र करावे.
3) नंतर कुकरमध्ये दोन ग्लास पाणी टाका त्यामध्ये बाउल ठेवा व त्या बाउल मध्येही पाणी  टाका   पाणी गरम होण्यासाठी (उकळी येणेसाठी ) कुकर गॅसवर ठेवा ,
4) एका पसरट भांडे घ्या ज्यात आपण वरील मिश्रण टाकणार आहोत , त्या भांड्याला आतून तेल लाऊन घ्या जेणेकरून मिश्रण भांड्याला चिकटणार नाही ,
5) वरील मिश्रणात इनो घालून पटापट  अंदाजे १५-२० सेकंद ढवळावे. मिश्रण थोडे फसफसायला लागते.व फुगून दुप्पट होईल  लगेच मिश्रण तेल लावलेल्या भांड्यात ओतून कुकरमध्ये वर   ठेवावे व कुकरचे झाकण लाऊन घ्यावे कुकरला शिट्टी लाऊ नये , 15-20 मिनिट मध्यम आचेवर शिजवून घ्यावा
6)जोवर ढोकळा  तयार होतो तोवर फोडणी करून घ्यावी. एका कढईत २ चमचे तेल गरम करावे. 1 लहान चमच मोहरी,  १/२ लहान चमचा हिंग, 2 हिरव्या मिरच्या ( उभ्या चिरलेल्या ) परतून घ्याव्या त्यात 1 कप पाणी घाला व उकळी येऊ द्या


7)15-20 मिनिटाने  गॅस बंद करावा , 2-3 मिनीटणे कुकरमधील भांडे बाहेर काढावे, ढोकला थोडा थंड होऊ द्यावा नंतर चाकूने त्याचे काप करून घ्यावे,  एका ताटात ढोकळयाचे काप काढून घ्यावे ( ताटात ढोकळयाचे भांडे उलटे करून )त्यावर तयार केलेली फोडणी चमच्याने पसरावी. त्यावर कोथिंबीर घालून सर्व्ह करावा

खोब्र्याच्या वड्या - coconut barfi


साहित्य :
  • 1 कोरडे नारळ ( खवलेले )
  • ५ ते ६ सोलून वेलची पूड
  • 300 gm साखर ( पावडर केलेली )
  • 2 ते 3 टिस्पून तूप
  • केशर 1 चिमूटभर , ठेचून किंवा केशर पावडर 2 ते 3 चिमूटभर (ऐच्छिक)
  • 8 ते 10 काजू तुकडे ( पर्यायी)
कृती :
  • सर्वप्रथम एका भांड्यात दुध गरम करून घ्या. 
  • आता त्यात खवलेले नारळ चांगले ढवळून त्याला एका तासाकारिता बाजूला ठेवा. 
  • आता एका भांड्यात तुप टाकून जरा गरम झाल कि त्यात पाणी व साखर टाकून दोन तारी चाचणी तयार करा . 
  • त्यात नारळाचे मिश्रण टाकून चांगले ढवळा, आता एका पसरट भांड्याला थोडे तूप लाऊन तयार मिश्रण टाका व व्यवस्थित पसरून घ्या. 
  • थोड्या केसरच्या वा काजूच्या तुकड्यांनी जरा सजवा व थंड व्हायला बाजूला ठेवा . 
  • थंड झाले कि तयार मिश्रणाचे हव्या त्या आकाराचे काप  करून अलगत वेगळे करा . 
  • आता तुमच्या खोब्र्याच्या वड्या तयार आहेत , तुम्ही यांना एका हवा बंद डब्यात भरून हवे तेव्हा खाऊ शकता . 

बटाटा वडा - Batata Wada

साहित्य :
  • बटाटा - 3 ते ४ मध्यम आकाराचे .
  • बेसन - २ कप.
  • धणे पावडर - 1 चमचा .
  • लाल मिरची पावडर - 1/4 चमचा .
  • गरम मसाला - 1/4 चमचा .
  • आमचूर पावडर - 1/4 चमचा .
  • हिरवी मिरची - 4-5 (चिरलेला)
  • कोथिंबीर - 100 ग्रॅम . (चिरलेला)
  • आले - 1 इंच लांब तुकडा . (चिरलेला)
  • रिफाइन्ड तेल - तळन्याकरिता  .
  • मीठ -आवशकतेनुसार .
कृती :
  • सर्वप्रथम बटाटे प्रेशर कुकरमध्ये उकळून घ्या . व थंड झाल्यावर सोलून त्यांना बाजूला ठेवा . 
  • आता एका वाट्यामध्ये बेसन घ्या , त्यात थोडी कोथिंबीर, थोड्या हिरव्या मिरच्या व मीठ टाकून थोडे थोडे पाणी घालीत मिक्स  करा जेणेकरून छान गुळगुळीत व थोडे घट्ट अस मिश्रण तयार होईल . आता तयारझालेले मिश्रण अमित कमी २० मिनिटाकरिता बाजूला ठेवा . 
  • एका पसरट भांड्यामध्ये बटाटे घ्या त्यात धणे पावडर, लाल मिरची पूड, गरम मसाला, आमचूर पावडर, मीठ, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घालून चांगले कूचकरून घ्या. आणि तयार मिश्रणाचे हव्या त्या आकाराचे लहान लहान गोल गोल गोळे तयार करा . 
  • एका कढईत तेल गरम करायला ठेवा, तेल चांगले गरम झाले कि एक एक बटाट्याचा गोळा बेसनाच्या मिश्रणात बुडवून कढईत  टाका व हलका तांबूस रंग होईपर्यंत तळुन घ्या . आता तयार झालेल्या बटाटा वड्यांना बाहेर काढून एका प्लेट मध्ये सजवा . 
  • गरम गरम बटाटे वडे तुम्ही टोमाटो केचप वा हिरवी मिरच्यान सोबत सर्व करू शकता . 



मुरमुरा लाडू - Murmura Ladoo

साहित्य -
  • 250 ग्रॅम मुरमुरे
  • 750 ग्रॅम गूळ
  • 3 व 1/2 कप पाणी
कृती - 
  • सर्व प्रथम मुर्मुर्याला एका कढईत जरा परतून घ्या . जेणेकरून मुर्मुर्याना थोडा कडक पण येईल 
  • आता कढईत गूळ आणि पाणी टाका व गुळ चांगला विरघळेपर्यंत कमी आचेवर शिजवा व नंतर जरा ग्यास वाढून दोन तारी सुसंगतता येईल इतके उकळा. 
  • दोन तारी सुसंगतता येताच त्यात त्वरीत मुरमुरे मिक्स करा . व गॅस बंद करा . 
  • मिश्रण थोडे थंड झाल्यावर हाताला पाणी लाऊन त्याचे लहान लहान लाडू करा . 
  • थोडे थंड होऊ द्या व नंतर सर्व करा . 

पाव भाजी - Pav Bahji


भाजी करण्यासाठी:

साहित्य :
  • बटाटा - 200 ग्रॅम चिरलेला 
  • गाजर - 100 ग्रॅम चिरलेला 
  • फुलकोबी - 100 ग्रॅम चिरलेला 
  • मटार 100 ग्रॅम किंवा 1 कप
  • तेल किंवा तूप  2 टे स्पून 
  • जिरे - 1/2 चमचा
  • हळद - 1/2 चमचा
  • मिरची पावडर - 1/2 चमचा
  • पाव भाजी मसाला - 2 चमचा
  • टोमॅटो - 2 बारीक चिरून
  • मिरची - 2 बारीक चिरून
  • आले - 1 तुकडा ( बारीक चिरलेला ) किंवा 2 चमचा पेस्ट
  • 4 - 3 - हिरव्या मिरच्या ( बारीक चिरून )
  • कोथिंबीर - 100 ग्रॅम ( बारीक चिरून )
  • लिंबू - 1
  • मीठ ( आवडीनुसार ) 
  • लोणी (आवश्यकतेनुसार )
कृती -
  • सर्वप्रथम सर्व भाज्या (बटाटे, गाजर , फुलकोबी इत्त्यादी ) एक कप पाणी आणि अर्धा चमचा मीठ टाकून चांगल्या उकळून घ्या . आता एका चमच्याच्या मदतीने सर्व भाज्या चांगल्या मॅश करा व बाजूला ठेवा . 
  • एका पॅन मध्ये तेल किंवा तूप गरम करायला ठेवा , गरम झालेल्या तेलात जिरे टाका . आता त्यात बारीक चिरलेला कांदा टाका व हलका तांबडा रंग येईपर्यंत परतून घ्या . 
  • नंतर त्यात हळद, टोमॅटो, मिरची पावडर आणि हिरव्या मिरच्या टाका व २ ते ३ मिनिटे सिजु द्या . आता त्यात आलं आणि पाव भाजी मसाला टाका आणि चांगले परतून घ्य. 
  • आता त्यात मॅश केलेल्या भाज्या टाका , आवस्क्तेनुसार मीठ आणि पाणी टाकून उकळी येऊ द्या . 
  • तुमची पावभाजी आता तयार आहे , आता तुम्ही ग्यास बंद करू शकता. 
  • आता एका वाटीत पावभाजी घेऊन तिला कोथिंबीर आणि लोण्याने सजवा . 

पाव बनवण्यासाठी :

साहित्य':
  • पाव - १०
  • लोणी (आवश्यकतेनुसार)
कृती -
  • पावांना मध्यभागातून एक भाग सोडून काप करा . 
  • एका गरम पॅन वर,थोडे लोणी वितळायला ठेवा . 
  • त्या पॅन वर २ ते ३ पाव ठेऊन त्यांची दोन्ही बाजू भाजून घ्या . आता थोडे लोणी पावांच्या आतल्या बाजूस लाऊन हलके तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या . आता आपले पाव तयार आहे. 
  • गरम गरम भाजी सोबत दोन पाव आणि एक कापलेल्या लिंबसोबत सर्व्ह करा. 

मिसळ पाव - Misal Pav

3.5 कप, मोड आलेली मटकी
1 मोठा किंवा मध्यम कांदा, बारीक चिरून
1 किंवा 2 हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
3 ते 4 लसूण, 1 इंच आलं -  पेस्ट
1 टिस्पून मोहोरी
२-३ मिर
१ लहान काडी दालचिनी
२-३ लवंगा
१ तमालपत्र1 टीस्पून जिरे (लिंबाचा रस)
10 ते 12 कढीपत्ता पाने
1 ते 1.5 टेस्पून कांदा लसुण मसाला / काला मसाला
१/२ टिस्पून हळद पावडर
दिड टिस्पून लाल तिखट
1 टिस्पून धणे पावड
1 टीस्पून जिरेपूड
1.5 चमचा बी नसलेला चिंच
¾ 1 कप पाणी किंवा आवश्यकतेनुसार
3 टेस्पून तेल
मीठ आवश्यक म्हणून

मिसळ पाव साठी:
8 ते 10 पाव
1 कप बारीक चिरलेला कांदा
1 कप बारीक चिरलेला टोमॅटो (पर्यायी)
1 कप जाड शेव किंवा फरसाण / चिवडा
1 लिंबू
⅓ कप कोथिंबीर

कृती-
  • मटकिला मोड आणण्यासाठी एका भांड्यात कोमट पाणी घेऊन त्यात मटकी  ७-८ तास भिजत ठेवा  नंतर भिजलेल्या मटकीला एका सुती कपडा मध्ये बांधून ठेवा
  • मोड आलेली मटकीला व्यवस्थित धुवून घ्या .
  • आणि एका प्रेशर कुकर मध्ये हळद आणि मीठ टाकून त्यात मटकी टाका . मटकी पूर्णतः पाण्यात बुडेल इतके पाणी टाका . (जर तुम्ही मटकी सोबत इतरही कडधान्य टाकत आसल तर पाणी थोडे जास्ती ठेवा. )
  • आता 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत शिजू द्या . 
  • एका भांड्यात दिड कप गरम पाणी टाका आणि त्यात चिंच 25 ते 30 मिनिटे भिजून घ्या . चिंच पिळून त्याचा कोळ बाजूला ठेवा . 
  • आलं-लसूण ,जिरे,मिर, दालचिनी,  लवंगा,तमालपत्र हे सर्व मिक्समधून बारीक़ करून घ्या  
  • एका  कढईत तेल गरम करायला ठेवा . 
  •  मोहरी टाकून तडकू द्या नंतर मिक्सरमध्ये बारीक़ केलेला मसाला टाका व् चांगला परतुन घ्या 
  • . आता त्यात कांदा घालून हलका तपकिरी होईपर्यंत परतून घ्या . 
  • नंतर, कढीपत्ता,  हिरवी मिरची घालून नीट हलवून घ्या . 
  • उर्वरित ¼ टिस्पून हळद, धणे पूड, जिरे पूड, लाल तिखट आणि गोड मसाला टाका .नीट ढवळून घ्या आणि नंतर चिंचेचा घट्ट कोळ टाका . आणि थोड्या वेळ सिजु द्या . 
  • आता मटकी प्रेशर कुकर मधून काढून तयार झालेल्या मिश्रणात टाका,  त्यात मीठ घाला  . व ¾  ते 1 कप किंवा आवश्यकतेनुसार पाणी घालून नीट ढवळून घ्या . 
  • कमी आचेवर जवळ जवळ 8 ते 10 मिनिटे उसळ  अधूनमधून हलवीत उकळु द्या . व शेवटी कोथिंबीर सह सजवा. 
  • बारीक कांदे आणि टोमॅटो चिरून घेऊन बाजूला ठेवा.
  •  सर्व्ह करताना वाटी मध्ये प्रथम चिरलेला कांदा व टोमॅटो घाला 
  • नंतर  वाफाळलेली  उसळ घ्या. 
  • बारीक चिरलेली कोथिंबीर घाला . व त्यावर लिंबाचा रस काही थेंब पिळा . 
  • नंतर फरसाण किंवा चिवड्या टाका .मिसळचा  आस्वाद घ्या . 

पोहे - Pohe

1.5 कप जाड पोहा
1 मोठा बटाटा
१ कांदा बारीक चिरलेला
1 हिरवी मिरची , बारीक चिरलेला
7 ते 8 कढीपत्त्याची पाने पाने
1 टिस्पून मोहोरी / राय
1 टीस्पून जिरे / लिंबाचा रस
1.5 ते 2 टेस्पून शेंगदाणे
दिड चमचा हळद
1 टिस्पून साखर किवा आपणास पोहे अधिक गोड हवे असल्यास थोडी अधिक .
2 ते 3 टेस्पून खवलेला ताजा नारळ
1 टेस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
लिंबू किंवा 1 टिस्पून लिंबाचा रस
2 ते 2.5 - टेस्पून तेल
मीठ - आवश्क्तेनुसार

कृती -
एखादा पॅन किवा कढई तापून त्यात 2 टेस्पून शेंगदाणे घालावेत.
शेंगदाणे लालसर होईपर्यन भाजून घेउन बाजूला ठेवा.
1.5 कप पोहा दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धून घ्या .
आणि एखाद्या गाळण्याच्या मदतीने पाणी गाळून घ्या . हे करताना पोहा तुटणार नाही आणि खूप जास्ती मऊ होणार नाही याची काळजी घ्या . हे केल्यानंतर पोहे पुरेसे पाणी शोषून घेतात आणि तो मऊ होतात .
पोहा मऊ झाला पाहिजे पण तो अखंड आणि मोकळा  पाहिजे याची दक्षता घ्या . जर पोहे माऊ झाले नसेल तर त्यात थोडे पाणी शिंपडा.
आता त्यात दिड टिस्पून हळद, 1 टिस्पून साखर आणि मीठ (आवशाक्तेनुसार ) घाला .हलक्या हाताने मिक्स करा.
एका पॅन किवा कढई 2 टेस्पून तेल घालून गरम करा व मंद आचेवर त्यात जिरे, मोहरी टाकून थोडे परतून घ्या.
त्यात बारीक केलेला बटाटा घाला . बटाट्यांचा रंग सोनेरी होईपर्यंत परतून घ्या .
कांदा (बारीक चिरलेला ) , हिरवी मिरची घालून कांदागुलाबी होईपर्यंत परतून घ्या .
आता 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घालून. अर्धा एक मिनिट परतून. शेंगदाणा कूट किवा शेंगदाणे घाला आणि चांगले ढवळा.
नंतर त्यात पोहा सोडा आणि हलक्या हाताने नीट हलवा . प्रत्येक गोष्ट समान रीतीने मिसळेल याची
काळजी घ्या . आणि मंद आचेवर पोहा सिजु द्या .
बारीक चिरलेली कोथिंबीर आणि किसलेले नारळ सोबत तयार झालेला पोहो सर्वे करा .

कांदा भजी - Kanda Bhji

कांदा - १ मध्यम किंवा १ उभे पातळ काप केलेला
हिरवी मिरची, - १ , बारीक चिरलेली
आले पेस्ट अथवा ताजे किसलेले आले - दिड चमचे
कढीपत्ता - ४-५, पर्यायी चिरून
कोथिंबीर - १ चमचे , बारीक चिरलेला
मीठ - चवीनुसार
हळद - ¼ चमचे
लाल तिखट - १ चमचे
धणे पावडर - दिड चमचे
ओवा  - ¼ चमचे
बेसन - कप दिड ते ⅓
तांदळाचे पीठ - 2 tablespoons

कृती -

एका भांड्यामध्ये काप केलेला कांदा घ्या .
त्यात चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता आणि आले पेस्ट टाका व चांगले मिक्स करून घ्या .
नंतर मीठ, हळद, लाल तिखट, धणे पावडर आणि ओवा टाका.
मग तांदळाचे पीठ व बेसन घालून चांगले मिक्स करा. जेणेकरून सर्व मसाला आणि पीठ कांद्याला व्यव्सतित झाकेल . आवशकता असेल तर बेसनाचे प्रमाण वाढाऊ शकता जेणेकरून कांद्यावर एक प्रत तयार होईल .
आता तयार झालेले मिश्रण १५ ते २० मिनिटे बाजूला ठेवा .
यादरम्यान कांदा पाणी सोडू लागेल आणि मिश्रण जर ओले दिसु लागेल . या मिश्रणात अतिरिक्त पाणी टाकायची आवशकता नाही कारण कमी पाणी जास्ती कुरकुरीत भजी .
आता कढई गॅस वर ठेऊन त्यात तेल गरम करायला ठेवा . तेल गरम झाल्यावर त्यात मिश्रणाचा एक थेम सोडून तेल पुरेसे गरम झाले कि नाही याची खात्री करून घ्या . जर तेल पुरेसे गरम झाले नसेल तर भजी खूप सारे तेल शोषून घेईल अथवा तेल खूप गरम झाले असेल तर बाहेरील भाग जळून आतमधला भाग कचा राहील .
आता हळू हळू थोडे थोडे मिश्रण हातात घेऊन ते तेलात सोडा आणि दोन्ही बाजूंने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भजी तळा . तळतअसतानाच त्यांना मधून मधून फिरवत रहा . जेणेकरून खूप गर्दी होणार नाही आणि भजी योग्य पद्धतीने तळ्ल्या जाईल.

तयार झालेली भजी एका प्लेट मध्ये काढून टाका. आणि गरम सर्व्ह करा.

चोकलेट सामोसा - chocolate samosa

चोकलेट सामोसा - chocolate samosa

साहित्य :
  • दीड कप मैदा 
  • २ ते ३ टीस्पून बारीक कुटलेली साखर 
  • २ टीस्पून तूप 
  • १ कप बारीक किसलेले चोकलेट 
  • १ टेबलस्पून पिस्ता (कापून बारीक केलेले )
  • तेल सामोसे तळन्याकरिता 
थोडा पाक बनविण्याकरिता :
  • ८ टीस्पून  बारीक केलेली साखर 
  • १ चूप पाणी 
कृती :
  • सर्वप्रथम एका भांड्यात मैदा घ्या त्यात साखर आणि तूप टाकून पाणी टाकीत एक घट्ट गोळा तयार करा व थोड्या वेळ बाजूला ठेवा . 
  • एका भांड्यात चोकलेट घ्या त्यात पिस्ता  आणि थोडी साखर टाका व चांगले मिक्स करून बाजूला ठेवा 
  • आता तयार कणकीचा गोळा घ्या व त्याचे हव्या त्या आकाराचे तुकडे करा व त्याची पोळी लाटायला घ्या . तयार पोळीचे मधनं दोन भाग करा व एका भागाला हातात घेऊन तिच्या कडांना थोडे पाणी लावीत दोन्ही कडा जोडा व कोण तयार करा. 
  • आता त्यात थोडे चोकलेट  चे मिश्रण भरा मिश्रण भरून दुसरी बाजू हलक्या बोटांनी बंद करा . 
  • एका भांड्यात ८ टीस्पून साखर घ्या व त्यात जवळ जवळ १ कप पाणी टाकून मिश्रण तयार करा . 
  • आत्ता एका प्यान मध्ये तेल गरम करायला ठेवा , तेल गरम झाले कि तयार सामोसे हलके तपकिरी होईपर्यंत टाळून घ्या . 
  • तयार सामोसे साखरेच्या मिश्रणात टाका व चांगले मिक्स करून एका प्लेट मध्ये काढा . 
  • तुमचे चोकलेट सामोसे तयार आहेत . तुम्ही हे केव्हाही चहासोबतसर्व करू शकता .