साहित्य :
- बटाटा - 3 ते ४ मध्यम आकाराचे .
- बेसन - २ कप.
- धणे पावडर - 1 चमचा .
- लाल मिरची पावडर - 1/4 चमचा .
- गरम मसाला - 1/4 चमचा .
- आमचूर पावडर - 1/4 चमचा .
- हिरवी मिरची - 4-5 (चिरलेला)
- कोथिंबीर - 100 ग्रॅम . (चिरलेला)
- आले - 1 इंच लांब तुकडा . (चिरलेला)
- रिफाइन्ड तेल - तळन्याकरिता .
- मीठ -आवशकतेनुसार .
कृती :
- सर्वप्रथम बटाटे प्रेशर कुकरमध्ये उकळून घ्या . व थंड झाल्यावर सोलून त्यांना बाजूला ठेवा .
- आता एका वाट्यामध्ये बेसन घ्या , त्यात थोडी कोथिंबीर, थोड्या हिरव्या मिरच्या व मीठ टाकून थोडे थोडे पाणी घालीत मिक्स करा जेणेकरून छान गुळगुळीत व थोडे घट्ट अस मिश्रण तयार होईल . आता तयारझालेले मिश्रण अमित कमी २० मिनिटाकरिता बाजूला ठेवा .
- एका पसरट भांड्यामध्ये बटाटे घ्या त्यात धणे पावडर, लाल मिरची पूड, गरम मसाला, आमचूर पावडर, मीठ, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घालून चांगले कूचकरून घ्या. आणि तयार मिश्रणाचे हव्या त्या आकाराचे लहान लहान गोल गोल गोळे तयार करा .
- एका कढईत तेल गरम करायला ठेवा, तेल चांगले गरम झाले कि एक एक बटाट्याचा गोळा बेसनाच्या मिश्रणात बुडवून कढईत टाका व हलका तांबूस रंग होईपर्यंत तळुन घ्या . आता तयार झालेल्या बटाटा वड्यांना बाहेर काढून एका प्लेट मध्ये सजवा .
- गरम गरम बटाटे वडे तुम्ही टोमाटो केचप वा हिरवी मिरच्यान सोबत सर्व करू शकता .
No comments:
Post a Comment