साहित्य – 1 लिटर दुध ( मलाई न काढता )
300 ग्राम साखर
2 लिंबाचा रस
कृती –
- एक स्वच्छ भांडे घेऊन त्यात दूध उकळून घ्यावे. जेवढा लिंबूचा रस आहे तेवढेच त्यात पाणी घाला व लिंबाचा रस हळूहळू उकळत्या दुधात , दुध फाटे पर्यन्त टाका आणि दुध हलवत रहा जेव्हा दुध चांगल्या प्रकारे फाटेल तेव्हा लिंबाचा रस टाकणे बंद करा , ह्या फाटलेले दुध एका सूती कपड्यात ओतून गाळून घ्या व ( तयार झालेल्या पनीरला ) कपड्यातच थंड पाण्याने धुवून घ्या जेणेकरून त्यातील आंबटपणा निघून जाईल.नंतर कपडा चारही बाजूंनी एकत्र गुंडाळून हाताने दाबून पाणी पूर्णपणे निथळून घ्या
- तयार झालेला गोळा एका ताटात काढा आणि हाताने एकजीव होईपर्यंत मळून घ्या व त्याचे लाडूसारखे छोटे छोटे गोळे तयार करून घ्या.
- नंतर एका पातेल्यात साखर व 4 कप पाणी टाका आणि उकळून घ्या, उकळी आल्यानंतर त्यात तयार केलेले गोळे एक एक करून सोडा.व पातेले झाकून ठेवा , 10 -15 मिनिट रसगुल्ले शिजवून घ्या
- तयार झालेले रसगुल्ले पाकासहित एका भांड्यात काढून घ्या व थंड होऊ द्या, 5- 7 तासानंतर हे रसगुल्ले तुम्ही सर्व्ह करू शकता.
No comments:
Post a Comment