Sunday, December 27, 2015

ढोकला रेसिपी - Dhokla

साहित्य -  Ingredients
1 कप बेसन पीठ / 1 cup Gram flour
1/2 कप  दही / 1/2 cup Curd (yogurt)
2 चमचे रवा / 2 tablespoon Semolina
1 चमचा साखर / 1 tablespoon Sugar
1 छोटा चमचा हळद /1 teaspoon Turmeric powder
१/२ चमचा आले पेस्ट / 1 teaspoon crushed Ginger paste
१/२ चमचा हिरवि मिरची पेस्ट/ 1 teaspoon crushed Green Chilli paste
१ चमचा तेल / 1 teaspoon Oil
चवीनुसार मीठ / Salt Add to taste(1 tsp)
इनो / 1 tsp Eno salt

फोडणी साठीचे साहित्य / For Tempering:
2 चमचा तेल / 2 tablespoons Oil
1 लहान चमच मोहरी/ 1 teaspoon Mustard Seeds
१/२ लहान चमचा हिंग / 1 pinch Asafoetida
2 हिरव्या मिरच्या ( उभ्या चिरलेल्या )/2 Green Chillies, slit lengthwise and cut into halves
कोथिंबीर/Coriander Leaves

कृती -
1) एका भांड्यात  १ कप बेसन पिठ घ्या  त्यात २ चमचे रवा ,1/2 कप दही 1/4 कप पाणी टाका   चांगले मिसळून घ्या व हे मिश्रण चार तास बाजूला ठेवा.
2) चार तासानंतर वरील मिश्रणामध्ये  1 चमचा साखर, १/२ चमचा मिरची पेस्ट, १/२ चमचा आले पेस्ट, १ लहान चमचा हळद, , १ चमचा तेल, चवीपुरते मिठ हे सर्व साहित्य एकत्र करावे.
3) नंतर कुकरमध्ये दोन ग्लास पाणी टाका त्यामध्ये बाउल ठेवा व त्या बाउल मध्येही पाणी  टाका   पाणी गरम होण्यासाठी (उकळी येणेसाठी ) कुकर गॅसवर ठेवा ,
4) एका पसरट भांडे घ्या ज्यात आपण वरील मिश्रण टाकणार आहोत , त्या भांड्याला आतून तेल लाऊन घ्या जेणेकरून मिश्रण भांड्याला चिकटणार नाही ,
5) वरील मिश्रणात इनो घालून पटापट  अंदाजे १५-२० सेकंद ढवळावे. मिश्रण थोडे फसफसायला लागते.व फुगून दुप्पट होईल  लगेच मिश्रण तेल लावलेल्या भांड्यात ओतून कुकरमध्ये वर   ठेवावे व कुकरचे झाकण लाऊन घ्यावे कुकरला शिट्टी लाऊ नये , 15-20 मिनिट मध्यम आचेवर शिजवून घ्यावा
6)जोवर ढोकळा  तयार होतो तोवर फोडणी करून घ्यावी. एका कढईत २ चमचे तेल गरम करावे. 1 लहान चमच मोहरी,  १/२ लहान चमचा हिंग, 2 हिरव्या मिरच्या ( उभ्या चिरलेल्या ) परतून घ्याव्या त्यात 1 कप पाणी घाला व उकळी येऊ द्या


7)15-20 मिनिटाने  गॅस बंद करावा , 2-3 मिनीटणे कुकरमधील भांडे बाहेर काढावे, ढोकला थोडा थंड होऊ द्यावा नंतर चाकूने त्याचे काप करून घ्यावे,  एका ताटात ढोकळयाचे काप काढून घ्यावे ( ताटात ढोकळयाचे भांडे उलटे करून )त्यावर तयार केलेली फोडणी चमच्याने पसरावी. त्यावर कोथिंबीर घालून सर्व्ह करावा

No comments:

Post a Comment